pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेची (शासन मान्यता प्राप्त)नविन कार्यकारणी/ व्यवस्थापन समिती जाहिर

0 3 1 0 9 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा व मेळावा खोपोली-रायगड येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश पोसतांडेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर सभेत संघटनेच्या उपविधी नियम ९ व १० नुसार संघटनेच्या कार्यकारणी/ व्यवस्थापन समितीवर नवीन पदाधिकाऱ्यांची दिनांक ११/०६/२०२४ च्या कार्यकारणी सभेत निवड करण्यात आली होती.
सुरेश पोसतांडेल -प्रदेशाध्यक्ष, रामेश्वर वाघमारे – प्रदेश कार्याध्यक्ष , गिरीश डुबेवार-प्रदेश उपाध्यक्ष, अनिल पवार -प्रदेश सरचिटणीस, लालू सोनकांबळे- प्रदेश कोषाध्यक्ष, विजय भोंडवे- प्रदेश संघटक यांच्या निवडीस एकमताने मान्यता देण्यात आली.
तसेच या सभेत असे मंजूर करण्यात आले की, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मा.शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी चार टप्प्यात आंदोलन करून जर मागण्यां मान्य न झाल्यास येणा-या विधान सभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
सदर सभेस सुरेश पोसतांडेल -प्रदेशाध्यक्ष,के.के.आंधळे- संस्थापक अध्यक्ष- प्रमुख, गिरीश डुबेवार-प्रदेश उपाध्यक्ष, अनिल पवार -प्रदेश सरचिटणीस, लालू सोनकांबळे- प्रदेश कोषाध्यक्ष, विजय भोंडवे- प्रदेश संघटक ,विश्वनाथ घुगे – संघटना प्रमुख, धर्मा खिल्लारे- प्रमुख मार्गदर्शक, मारोती गायकवाड- राज्य समन्वयक,देवराम मुके,सदाशिव कवडे-कार्यालय प्रमुख, प्रशांत रहागडले -सह.सरचिटणीस झुंबर माने- कायदेशीर सल्लागार ,सल्लागार समिती- सदाशिव कवडे,रमेश वाळकीकर,ञिंबक देशमुख, गजानन इंगळे,सुभाष मोरे,सोनुने तसेच महीला संघटक- रंजना दुर्गाडे,हिमाली कुलकर्णी,अश्विनी धोंडगे,शैलेजा फुलारे , विभागीय अध्यक्ष-नासीर अली सय्यद (नागपूर),बलभीम शेंडगे(मराठवाडा),मंगेश पाटील (कोकण),किरण आहेर(नाशिक)जिल्हा अध्यक्ष-राजेश शिंदे (रायगड), जालींदर पवार (नाशिक)सुभाष साळुंखे(ठाणे) मार्तंड वनजे(नांदेड),मंगेश पेडामकर (रत्नागिरी),देवा देवकुळे,संतोष देशमुख, सुनिल जाधव तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी,सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
03:56