pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयात भूगोल दिन साजरा

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

कोंकण ज्ञानपीठ,उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात भूगोल विभागाच्या भूगोल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख डॉ. आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. गर्जे उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भूगोल विषयाचे महत्त्व विशद करताना, बदलत्या जागतिक परिस्थितीत भूगोलशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. पर्यावरण, हवामान बदल, शहरीकरण व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यामध्ये भूगोलाची भूमिका अधोरेखित केली.प्रमुख वक्त्या प्राध्यापिका डॉ. अनुपमा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जीआयएस , रिमोट सेन्सिंग, पर्यावरणीय अभ्यास, आपत्ती व्यवस्थापन अशा आधुनिक शाखांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
भूगोल विभाग प्रमुख डॉ. आनंद गायकवाड यांनी प्रास्ताविकातून भूगोल दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ प्राध्यापक आर. टी. ठवरे आय क्यू.ए सी. समन्वयक डॉ. ए.आर. चव्हाण ,इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम.जी. लोणे, डॉ. डी पी हिंगमिरे आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.आभार प्रदर्शन डॉ. अनुपमा कांबळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे