” स्पर्श” – कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 अंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.30
जिल्हयात “स्पर्श ” कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 अंतर्गत आज शहरात रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद, कार्यालय, अंबड चौफुली, सतकर कॉम्प्लेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय जालना मार्गे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालय येथे स्पर्धेचा समारोप झाला.
सहभागी स्पर्धकांमधुन पुरुष गटात योगेश नानाभाऊ पडोळे, वैभव राजेंद्र शिंदे, अप्पासाहेब गणपत नजन यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली तसेच महिला गटात प्रियंका ओकसाळ, आरती ज्ञानेश्वर ठोकळ, रेश्मा राम पवार यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम पुरुष व महिला गटास अनुक्रमे रु.4000/- 2500/- व 1500/- व प्रशस्तीप्रत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. मेश्राम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, वैद्यकिय अधिकारी डॉ. पवार डॉ. काकड, डॉ. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राहुल राउत, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील कर्मचारी सर्वश्री सावंत, मगर, देवकते, डाके, श्रीमती दांडगे, डॉ. रोहन ठोंबरे, पठाण तसेच जिल्हा हिवताप, जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.