pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विकी पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा.

0 1 1 8 2 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

दमदार आमदार महेश बालदी यांचे कट्टर समर्थक तथा विकी पाटील युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकी पाटील यांचा वाढदिवस उरण तालुक्यात विविध सामाजिक – उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात.विकी पाटील युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक , अध्यक्ष विकी पाटील व आमदार महेश बदली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील नेरे येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात वृद्धांना गरजेच्या वस्तूचे वाटप करण्यात झाले. यावेळी विकी पाटील यांनी वृद्धासोबत संवाद साधून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत त्यांची आस्थेने विचारपूस केली. वृद्धांना गरजेचे साहित्य दिल्याने वृद्धांनी आनंद व्यक्त करत विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजप नेते निर्गुण कवळे, केशव पाटील, देवा पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील , कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सचिव प्रेम म्हात्रे, सदस्य प्रकाश म्हात्रे, हेमंत ठाकूर तसेच विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे सहकारी दत्ताशेठ केंद्रे,नितीन शेठ पाटील,शुभम चोरगे,विजयभाऊ कडवेकर,भाविक पटेल,बिपीन शेठ, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी संतोष ढोरे,ईश्वर ढोरे,अल्लौद्दीन शेख या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2