pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना येथे 9 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि. 7 

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुस-या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, 2 माळा, जालना येथे दिनांक 9 ऑगस्ट, 2023 बुधवार सकाळी 10.00 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटल, जालना यांची ए.एन.एम/ जी.एन.एम/ बी.एस्सी नर्सिंग नर्सिंग स्टाफ 8 पदे, बारावी पाससाठी 1 पद, पदवीधर साठी डेटा एंट्री ऑपरेटर 1 पद, कॉपविजन एनफोर्समेंट सर्व्हिसेस प्रा. लि. जालना यांची दहावी व आयटीआय इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियन 30 पदे, दहावी व आयटीआय वायरमनसाठी वायरमन 30 पदे, बी. एस्सी नर्सिंग 20 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स लि. औरंगाबाद यांची दहावी/बारावी/पदवीधर सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह 20 पदे, पदवीधर (MBA/MSW) एच. आर. एक्झिक्युटिव्ह 3 पदे, पदवीधर (बी. कॉमर्स) साठी अकाऊंटंट 2 पदे, टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रा. लि. पुणे यांची दहावी/बारावी/पदवीधर साठी असेंबली लाइन ऑपरेटर 20 पदे, अशी एकूण 136 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR-5 (2023-24) JALNA याची निवड करावी. उद्योजक/ नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत 2 माळा, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, संपत चाटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4