pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र

0 1 7 7 2 3

जालना/प्रतिनिधी,दि. 26

18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 47 उमेदवारांनी 68 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज दि. 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक राजेश कुमार यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात सुपडू आत्माराम पाटील (अपक्ष), शिवाजी उत्तम भारस्कर (अपक्ष), दिगांबर बापूराव कऱ्हाळे (भारतीय वीर किसान पार्टी), भाऊसाहेब घोडके (अपक्ष), रमेश त्र्यंबक बावस्कर (लोकराज्य पार्टी), निला गौतम काकडे (अपक्ष), नारायण त्रिंबक सोन्नी (अपक्ष), राजेंद्र भाऊसाहेब देशमुख (नॅशनल इंडियन काँग्रेस), परमेश्वर पि किसनराव भिसे (अपक्ष), शेख आनिस शहामद (अपक्ष), अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष), दादा गोविंदा भोंबे (अपक्ष)  यांचे नामनिर्देशन अर्ज अपात्र ठरले.

यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर आदींसह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उमेदवारांना सोमवार, दि. 29 एप्रिल, 2024 पर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहे. सोमवार, दि. 13 मे 2024 रोजी 18-जालना लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी जाहिर करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे