pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अत्याधुनिक जिल्हा नियंत्रण कक्षाचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ  

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.10

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे (वॉर रुम) अंतर्गत सजावटीसह विस्तारीकरण करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह तंत्रज्ञानाने  सुसज्ज अशा जिल्हा नियंत्रण कक्षाचे आज केंद्रीय रेल्वे  राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नियुक्त वास्तुविशारद जगदीश नागरे, उपजिल्हाधिकारी संगिता सानप, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी   उपस्थित होते.
जिल्हा नियंत्रण कक्षात (वॉर रुम) सुसज्ज आसन व्यवस्था, मोठ्‌या स्क्रिनचा कॉम्प्युटर,  विविध धरणातील पाणी साठा, वारंवार विजा कोसळणाऱ्या गावाची माहिती, पुर परस्थिती बाधित गावांची माहिती उपलब्ध आहे. व्हिसीद्वारे तात्काळ अंमलबजावणीच्या सुचना देता येतील आणि आवश्यक त्या घटकांशी संवाद साधण्याची त्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुखांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे जे मोहिम स्वरुपातील, अतितातडीची, अत्यंत महत्वाची आणि युध्द पातळीवर करावयाची कामे करण्यास मदत होणार आहे. येथे उपलब्ध असलेल्या मल्टीपल स्क्रीनद्वारे प्रशासनाकडून आदेश देणे तसेच जिल्हा आराखडे, विविध संकेतस्थळे हे एकाचवेळी पाहणे यामुळे शक्य होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ञ अधिकाऱ्यांची मते आपत्ती निवारण करण्यासाठी तात्काळ उपलब्ध होतील. नियंत्रण कक्षाचे अंतर्गत सजावटीचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल वास्तुविशारद श्री. नागरे यांचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे व जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी अभिनंदन केले. या कक्षामुळे आपत्ती निवारणाची कामे वेळेत पार पडण्यासाठी विविध अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरुन निर्देश देणे सोपे झाले आहे. यावेळी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4