pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंबड शहराला १२ एमएलडी पाणी देण्यास प्रखर विरोध करणार – अक्षय गोरंटयाल

जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी पाऊल उचला विशाल धरणे आंदोलनात महापालिकेला युवा नेते अक्षय गोरंटयाल यांचा इशारा

0 1 7 4 1 4
 जालना/प्रतिनीधी,दि.31
शहरातील पाणी प्रश्नासह स्वच्छ्ता आणि अन्य नागरी सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी जालना पालिका प्रशासनाने येत्या १५ दिवसात सकारात्मक पाऊल उचलावे नसता आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतांनाच जालना शहर वासियांच्या हक्काच्या असलेल्या जायकवाडी योजनेतून अंबड शहराला १२ एमएलडी पाणी देण्यास आपला ठाम विरोध असून गरज पडल्यास जालना शहर बंदची हाक देण्यात येईल असा रोखठोक इशारा काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी आज येथे बोलतांना दिला.

जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही जालना शहर महानगर पालिकेच्या गलथान व बेजबाबदार कारभारामुळे शहरात १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून त्यातही अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांमधून विशेषतः महिला भगिनिंमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अनेक भागातील नागरिक आणि महिलांनी जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल आणि युवा नेते अक्षय गोरंटयाल यांची भेट घेऊन पाणी प्रश्नासंदर्भात असलेल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या.त्यानंतर युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी जालना शहर महानगर पालिका आयुक्तांची भेट घेवून शहरातील पाणी पुरवठा,स्वच्छता,पथदिवे यासह नागरी सुविधांचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास बुधवार दि.३१ जानेवारी रोजी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.या अनुषंगाने आज बुधवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत महापालिकेसमोर काँग्रेसचे पदाधिकारी,माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसह जोरदार लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलतांना अक्षय गोरंटयाल म्हणाले की, लोकप्रतिनिधी असल्याने आम्हाला लोकांच्या समस्यांची जाण होती.नगराध्यक्ष पदावर असतांना माझी आई सौ. संगिताताई गोरंट्याल तसेच पार्वताबाई रत्नपारखे,पद्मादेवी भरतीया यांच्या कार्यकाळात देखील अनेक अडचणी असतांनाही आम्ही पाणीपुरवठा,स्वच्छता,दिवाबत्ती आदी नागरी सुविधांच्या बाबतीत नागरीकांची गैरसोय होवू दिली नाही.मात्र प्रशासकांच्या हातात कारभार येताच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या बंद,१५ ते २० दिवस पाणीपुरवठा होत नाही,झालाच तर कमी व दूषित पाणी पुरवठा केला जात असून पथदिवे बंद,स्वच्छतेचा अभाव आदी अनेक नागरी समस्या वाढल्या आहेत.ही बाब महापालिकेचा दर्जा प्राप्त झालेल्या या कार्यालयाला निश्चितच शोभा देत नाही असा टोला युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी यावेळी लगावला.आयुक्तांना निवेदन देवून सर्व समस्या सोडविण्याची मागणी आम्ही आज केली.परंतू वेळ देवूनही महानगपालिकेच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने आज हे आंदोलन करावे लागत आहे.येत्या १५ दिवसात महानगरपालिकेचा कारभार सुधारला नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गोरंट्याल यांनी यावेळी बोलतांना दिला.आमच्या कार्यकाळात आठवड्यातून दोन वेळा पाणी दिले जायचे आता १५ ते २० दिवस पाणी मिळत नाही. अशी वाईट अवस्था झाली असून घाणीचे साम्राज्य देखील वाढले आहे.शिवाय ४८ घंटागाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जात होता.त्यामुळे स्वच्छतेच्या रॅँकींगमध्ये जालन्याचा २२ वा क्रमांक होता. आता ही रँकिंग पार ढेपाळली असून जालना महापालिका १९५ व्या क्रमांकावर आली आहे.
शहरातील केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन नगर पालिकेने शहरालगत सामनगाव येथे घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू केले.या प्रकल्पासाठी आ.कैलास गोरंट्याल यांनी मागील टर्ममध्ये निधी आणून ९५ टक्के काम पूर्ण केले.आता फक्त ५ टक्केच काम शिल्लक असतांना त्यालाही दोन वर्षे झाली.हे पाच टक्के कामही पूर्ण होत नसल्याने महानगरपालिका याविषयी किती गंभीर आहे, हे लक्षात येते. महापालिकेच्या या कारभाराचा आपण तीव्र निषेध करीत असून लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वीत करावा,तसेच जालना शहरातील जनतेच्या हक्काच्या असलेल्या जायकवाडी योजनेद्वारे राज्य सरकारच्या निर्देशानुसार अंबड शहराला ४ एमएलडी पेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जात असून उचल करण्यात आलेल्या पाण्याचे तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अंबड नगर परिषदेकडे थकली आहे.असे असतांनाही आता याच योजनेतून अंबडला १२ एमएलडी पाणी देण्याचा घाट राज्य शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.असा निर्णय जर घेतल्या गेला तर जालना वासियांना पुन्हा पूर्वी सारखे भीषण पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त करत या निर्णयास युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी कडाडून विरोध करत गरज पडल्यास जालना वासियांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.तत्पूर्वी महावीर ढक्का,वाजेद पठाण,मोहम्मद नजीब,महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार यांनी आपल्या भाषणातून शहरातील समस्या मांडल्या.यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख महेमूद,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी,जेपीसी बँकेचे संचालक दीपक भुरेवाल,राम सावंत,नंदाताई पवार,शीतलताई तनपुरे,अब्दुल रऊफ परुसूवाले,बदर चाऊस,रमेश गौरक्षक,राज स्वामी,विनोद रत्नपारखे,राजेंद्र वाघमारे,रवी जगदाळे,रहीम तांबोळी,विनोद यादव,हरीश देवावाले,संतोष माधोवाले,अशोक भगत,संजय भगत,शेख शकील,श्रावण भुरेवाल,जीवन सले,नजीब लोहार,अरुण मगरे,वीणा सामलेट,संगीता पाजगे,अरुण सरदार,शेषराव जाधव,फकिरा वाघ,रविंद्र राजन,वैभव उगले,काँग्रेस पक्षाचे सर्व माजी नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी,अक्षय गोरंटयाल मित्र मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह शहरातील महीला,नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे