pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांसाठी अर्ज सादर करावेत 

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.26

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचतगटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदान तत्वावर वितरीत करण्याची योजना जालना समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधीत बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ पुरुष व महिला बचत गटांना देण्यात येतो. सन 2023-24 या चालु आर्थिक वर्षात लाभ मिळविण्यासाठी इच्छुक व पात्र बचत गटांकडुन दि.20 जानेवारी, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे