महाराष्ट्र

बदनापूर तालुक्यातील ८९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.

जालना /प्रतिनिधी : दि10

बदनापूर तालुक्यातील ७ ९ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण आज मंगळवारी (ता.१०) तहसील कार्यालयात तहसीलदार छाया पवार यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षण सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी आहे. ७९ पैकी ४५ ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण तर २३ ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी सुटले आहे. अनुसूचित जाती-म्हसला- भातखेडा, वाकुळणी, रामखेडा- पाडळी, बाजार वाहेगाव, गोकूळवाडी, माळेगाव, मांडवा, देवपिंपळगाव, धोपटेश्वर, सिरसगाव घाटी, मांजरगाव आणि बावणेपांगरी तर अनुसूचित जमातीसाठी भिलपुरीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) -घोटण, आन्वी राळा, खामगाव, दुधनवाडी, वाल्हा, रांजणगाव, धामनगाव, सागरवाडी, दावलवाडी, अकोला, राजेवाडी- रमदुलवाडी, खडकवाडी, काजळा-पानखेडा, ढोकसाळ, डोंगरगाव सायगाव, अंबडगाव, कंडारी बु., तळणी लोधेवाडी, चिखली, लक्ष्मणनगर आणि तुपेवाडी. खुला प्रवर्ग-उर्वरित ४५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २३ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात विल्हाडी, राजेवाडी- खोडावाडी, दाभाडी हिवरा, दाभाडी डोंगरगाव , सायगाव, कुंभारी, सिंधी पिंपळगाव, कडेगाव, पिरसावंगी, जवसगाव, भाकरवाडी -धनगरवाडी, कंडारी बु., नानेगाव, उज्जैनपुरी, वंजारवाडी -दाबका तांडा, डावरगाव, रोषणगाव, चनेगाव, निकळक, हिवरा राळा, वाघुळ दाभाडी, सेलगाव, सोमठाणा, भराडखेडा, असरखेडा, चितोडा, खादगाव, नजिकपांगरी, वरुडी, हालदोला, ढासला पिरवाडी, मानदेऊळगांव-दगडवाडी, बुटेगाव, कुसळी, गेवराई बाजार, केळीगव्हाण, असोला, पठार देऊळगाव, देवगाव, किन्होळा, मात्रेवाडी, मालेवाडी -सुंदरवाडी, कस्तुरवाडी, नांदखेडा, मेव्हणा याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण सोडतप्रसंगी पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, नायब तहसीलदार शेख फारुखी आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .