pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मेहकरच्या भव्य सोनार समाज महासम्मेलनात विविध स्तरातील व्यक्तींचा गौरव व सत्कार . – प्रसिध्दी सहयोग मध्ये पत्रकारांचाही सन्मान.

0 1 7 2 6 3

 

वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे,दि.30

आॕल इंडिया सोनार फेडरेशन व सोनार विकास प्रतिष्ठान,मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर,जि.बुलडाणा येथे नुकतेच ‘सोनार जोडो अभियान ‘ अंतर्गत विदर्भस्तरीय सर्वशाखीय सोनार समाज महासम्मेलन संपन्न झाले. या सम्मेलनात विविध स्तरातील व्यक्ती ,संस्था /संघटनेचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते ,उच्चशिक्षित व गुणवंत विद्यार्थी ,प्रसिध्दी सहयोगचे पत्रकार,कलावंत आदींचा प्रोत्साहनपर स्वागत व सत्कार करण्यात आले.या सोहळ्यास प्रामुख्याने खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.आॕल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर ,राष्ट्रीय उपाध्यक्ष विलासराव अनासने ,सोनार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास काटकर आदींनी मान्यवर व विविध सन्माननीय व्यक्तींचे सत्कार केले.या कार्यक्रमात व्यक्तिशः, संस्था/संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांना ‘सेवाव्रती पुरस्कार ‘देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये डाॕ.गजानन रत्नपारखी,दत्तात्रय मैद,अनिल वालोकर,प्रकाशराव तारेकर,डाॕ गजानन कर्हे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच समाजातील डाॕक्टर,सी.ए.,बी.ई.सिव्हिल,डी.एड, कलाकौशल्य उच्चशिक्षित असे गुणवंत विद्यार्थी डाॕ.शुभम विष्णुपंत खंदारकर,डाॕ.निरज अनिल काटकर,डाॕ.कु.श्रेया सुधीर सारोळकर,इंडियन आयडाॕल कलावंत कैवल्य केजकर,कु.आनंदी अनंत खंदारकर, कु.सरिता कृष्णा हिवरकर, अक्षय सुरेश खंदारकर, कु.प्रियंका अशोक वाळेकर,कु.रोशनी धरमकर यांचा गुणगौरव करुन सन्मानित करण्यात आले.समाजातील कर्तुत्वानांचाही याप्रसंगी गौरव करुन सत्कार करण्यात आला.सोहळ्यात आपातकालीन वैद्यकीय सेवा निधी व संत नरहरी महाराज कन्यादान योजना या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.प्रामुख्याने श्री.द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने महासम्मेलन आयोजक मोहनसेठ हिवरकर यांना ‘समाजगौरव पुरस्कार ‘ अनंतराव उंबरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.प्रचार -प्रसार माध्यमातून प्रसिद्धी सहयोगचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रसिध्द स्वतंत्र पत्रकार आत्माराम ढेकळे,रुग्वेद न्युज चॕनेलचे संचालक दिनेश येवले,प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष अनिल उंबरकर,पोलखोल टाईम्सचे संपादक भगवानराव शहाणे,सुवर्णजागृतीचे संपादक अमोल बुट्टे आदी पत्रकारांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचेआयोजन नियोजनबध्द होते.सम्मेलनात डाॕ.देवेंद्र शेरेकर यांनी प्रास्ताविकात फेडरेशनच्या कार्याचा आढावा देऊन शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांचा उल्लेख केला.खा.जाधव व आ.रायमुलकर यांनी आपल्या भाषणातुन अशा प्रोत्साहनपर संघटीत कार्य करणाऱ्या संस्थेस समाज उन्नती व विकास कार्यासाठी नक्कीच सहकार्य राहील.असे यावेळी आश्वासन दिले.तर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर यांनी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची समाजात आवश्यकता आहे.असे नमुद करुन यासह इतर मागण्यासाठीही पाठपुरावा व आपले प्रयत्न आहेत .असे मनोगतातुन व्यक्त केले.या सम्मेलनात महिलांचीही लक्षनीय उपस्थिती होती.दुसऱ्या सत्रात ‘भाग्यवान महिलांना भेटवस्तु वाटप मध्ये सोडत पध्दतीने पैठणी साड्याचे वाटप करण्यात आले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी फेडरेशन,प्रतिष्ठान चे ट्रस्टी,विश्वस्त तसेच संत नरहरी महाराज सोनार समाज मंडळ,मेहकरचे पदाधिकारी,सदस्य,स्थानिक कार्यकर्ते समुहाने परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे