कुंचेली फाटा व कुंचेली गावात सर्व राजकिय नेत्यांना गावबंदी, मतदानावर जाहिर बहिष्कार

नांदेड/प्रतिनिधी,दि.29
नायगाव तालुक्यातील कुंचेली फाटा व कुंचेली गावात
सर्व राजकिय नेत्यांना गावबंदी, मतदानावर जाहिर बहिष्कार टाकत असलेल्या बोर्डाचे अनावरण दि.२९ ऑक्टो. २०२३ रोजी सकाळी १०वाजता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मराठा योध्दा मनोज पाटिल जरांगे यांनी अनेक दिवसांपासुन सनदशीर मार्गाने शांततेत आंदोलन चालु असताना करोडो मराठा बांधव रसत्यावर येऊन न्याय हक्क मागत असताना अमरण ऊपोषण स्थळि राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला कायद्यात टिकनारे आरक्षणासाठी कांहीं दिवसांचा कालावधी शासनाने तिस दिवसांचा वेळ मागितला तर समाजाने दहा दिवस अधिक म्हणजे चाळिस दिवस देऊन सुध्दा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेत शासनाने अश्वासन न पाळल्यामुळे अनेक तरुण आपला जीव गमावला तरी लोकप्रतिनिधी जागे होत नाहि. आत्महत्या तरुणांनी करु नये असे तरूणांना हात जोडुनि विंनती करण्यात येते. आपल्या हक्काचे प्रश्न संसदेत मांडण्या साठी सतेत पाठविलेल्या राजकिय खासदार आमदार जनतेच्या समाजाकडे दुर्लक्ष करुन आपले प्रश्न न मांडता त्यांच्या दहा पिढिची सोय करून घेण्यात मग्न असतील तर अशा सर्व राजकिय पुढाऱ्यांना गाव बंदी व निवडणुकीवर जाहिर बहिष्कार टाकण्यासाठि कुंचेली ता. नायगाव पाटिवर व गावात बोर्डाचे अनावरण दि.२९ ऑक्टो. २०२३ रोजी सकाळी १० वाजता सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाला त्यावेळेस सहपोलिस निरिक्षक रामतिर्थ येथील पोलिस उपस्थित होते.
सकल मराठा कुंचेलीच्या वतीने गावकऱ्यांनी घोषणा करुन परिसर दणानला तर सर्व राजकिय नेत्याना गाव प्रवेश बंदि गावकरी शांततेच्या मार्गाने करीत असता गावात येऊन सकल मराठा समाजाला चिडवण्याचे काम करू नये प्रवेश ब़दी असताना प्रवेश केल्यास प्रकरण चिघळल्यास गाव जबाबदार राहानार नाहि.
असे प्रसिध्दी पत्रक सकल मराठा आरक्षण समिती कुंचेली
च्या वतीने देण्यात आले.