शिवसेनेच्या वतीने निषेध रॅली काढून दहशतवाद्यांचा निषेध.
उरण तालुक्यात सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना करण्याची केली मागणी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29
शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे, तसेच खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशाने उरण तालूका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख दिपक ठाकूर यांनी पहलगाम येथील घटनेचा निषेध करत निषेध रॅलीचे आयोजन केले होते. या प्रसंगी पहलगाम येथे अतिरेक्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबांवर गोळीबार करून अनेक लोकांना जीवे ठार मारण्यात आले या अमानुष कृत्याचा निषेध करण्यात आला.उरण पंचायत समिती मध्ये उरण तालुक्याच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्यात अश्या प्रकारचे पत्र देऊन नंतर तहसील उरण येथे पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीला संबोधित करण्यासाठी उपस्थित अतुलशेठ भगत जिल्हाप्रमुख रायगड, रुपेश पाटील सचिव युवासेना, मेघाताई दमडे जिल्हाप्रमुख महिला , रमेश म्हात्रे संपर्कप्रमुख उरण विधानसभा, मनोज घरत विधानसभा संघटक, दिपक ठाकूर तालूका प्रमुख उरण, प्रणाली म्हात्रे तालुकाप्रमुख महिला , सुनील भोईर शहरप्रमुख उरण , चंद्रकांत पाटील तालुकासंघटक, तृप्ती घरत उपतालुका प्रमुख महिला , आदिनाथ भोईर माजी तालुकाप्रमुख , अक्षय म्हात्रे विभागप्रमुख ,गणेश घरत विभागप्रमुख , अक्षय घरत विभागप्रमुख , महेश पाटील केगांव उपविभाग प्रमुख तसेच अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.