pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जसखार गावातील ग्रामसुधारणा मंडळाची २०२३-२४ निवडणूक संपन्न.

0 1 7 4 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4υ

ग्रामसुधारणा मंडळ जसखार यांची कार्यकाळ मुदत २५ ऑगस्ट २०२३ संपत असल्या कारणाने दिनांक २७ ऑगस्ट रोजी गाव अध्यक्ष व सेक्रेटरी आणि पंच कमिटी यांची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हि निवडणूक संपूर्ण गावच्या एकजुटीने व्हावी व गावात शांतता नांदुन गावच्या विकासा साठी प्रयत्नशील रहावे अशी सर्व ग्रामस्थांची ईच्छा होती.मागील आठ महिन्यां पूर्वी गावच्या ग्रामपंचायत निवडणूक झाली होती व त्या निवडणुकीत ग्रामस्थांनी युवा नेतृत्वाला पसंदी दिली होती.त्यामुळे या ग्रामसुधारणा अध्यक्ष व सेक्रेटरी निवडणुकीत कोण सरशी ठरेल याची उत्सुकता सर्व ग्रामस्थांना होती.ग्रामस्थांनी ठरविल्या प्रमाणे या वर्षी अध्यक्ष निवडणुकीचा मान यावेळी गावातील नगारे आली आणि सेक्रेटरी पद मान भट आळी यांना होता.नगारे आळी आता पर्यंतच्या निवडणुकीचा इतिहासात घरत कुटुंब नेहमी अग्रेसर भूमिका बजावत निर्विवाद वर्चस्व मिळवित आला आहे म्हणून या घरत कुटुंबाचा वतीने गणेश घरत यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका जसखार ज्येष्ठ नेते सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून घरत कुटुंबाचे सेवेसर्वा हरीचंद्र शेठ घरत यांनी मान्यता दिली त्यामुळे नगारे आळीचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व सूर्यकांत ठाकुर आणि डॅशिंग व्यक्तिमत्त्व निशांत ठाकुर यांनी सदर निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी प्रयत्न सुरू केले.परंतु गणेश घरत हे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे गटाचे विभाग प्रमुख असल्या कारणाने उबाठा गटाकडून अनंत घरत यांनी अध्यक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले परंतु जसखार ग्रामस्थांनी गणेश घरत यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले.तसेच भट आली सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीत एक सर्वसामान्य कुटुंबातील अक्षय प्रभाकर घरत याना संधी मिळावी अशी सर्व भट आळी व गावातील तरुणाची इच्छा होती. परंतु अक्षय घरत हे माजी सरपंच दामुशेठ घरत व शिवसेना शाखा प्रमुख अमित ठाकुर यांचे निकटवर्तीय असल्या कारणाने अक्षय घरत यांच्या विरुद्ध काँग्रेस च्या अनिल म्हात्रे उर्फ अण्या टेलर यांना काँगेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. या मध्ये निवडणूक मध्ये पुन्हा ग्रामस्थांनी युवा तरुणाला संधी दिली व अक्षय घरत सेक्रेटरी म्हणून निवडून आले.उरण तालुक्यातील राजकारणामध्ये जसखार गावाचे अनन्य साधारण महत्व आहे कदाचित जसखार गावातील अंतर्गत राजकारणामुळे गावच्या विकासामध्ये नुकसान होत आहे म्हणून ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर युवा सामाजिक संस्थेच्या तरुणांनी सर्व गावची एकजूट व्हावी या साठी जसखार गावच्या राजकारणातील केंद्र बिंदू पि.जे.पाटील यांची भेट घेतली व सर्व गाव एकजूट व्हावी या करीता प्रस्ताव ठेवला.पी.जे.पाटील यांनी युवा सामाजिक संस्थेच्या सर्व तरुणांचे एकजुटी प्रयत्न व गावचा विकास व तरुणांना नोकरी व व्यवसाय मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला व ग्रामसुधारणा मंडळ, भाजपा,शिवसेना, मनसे,शे का पक्ष, राष्ट्रवादीं अशी सर्व पक्षीय एकजूट करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरविले. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत गणेश घरत अध्यक्ष व अक्षय घरत सेक्रेटरी यांना पी.जे.पाटील,उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था हरीचंद्र घरत,सुरेश म्हात्रे, प्रशांत पाटील, सूर्यकांत ठाकुर,उपसरपंच प्रणाली म्हात्रे, हेमलता ठाकुर, धनवंती ठाकुर, सीमा ठाकुर दमयंती म्हात्रे, वैजयंती ठाकुर उमेश पारवे, संजय तांडेल, किशोर पाटील, नितीन पाटील, अमित ठाकुर, निशांत ठाकुर, जगदीश घरत,भूषण ठाकुर, निलेश घरत, किशोर म्हात्रे, कू. गर्दीश म्हात्रे, गिरीश मोकल, रितेश म्हात्रे, मयूर तांडेल व सर्व नवनियुक्त पंच कमिटी यांनी मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील गावच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळ निवडणुकी नंतर सर्व जसखार ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या गावावर होत असलेल्या रोजगार व व्यवसाय संबधित स्थानिक प्रशासना मार्फत होणाऱ्या अन्याया विरुध्द मोठ्या प्रमाणात लढा उभारून जसखार गावच्या सर्वागीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कटिबध्द रहावे असे प्रतिपादन अमित ठाकुर शिवसेना शाखा प्रमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आभार प्रदर्शन कार्यक्रमात व्यक्त केले. व सर्व नवनियुक्त ग्रामसुधारणा मंडळ यांना सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे