pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

समान व असमान निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0 1 7 4 1 5

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.3

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. 2022-24 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून उपलब्ध  करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2023-24 साठीच्या समान निधी योजना- इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना – रुपये 25 लाख रूपये.

सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य. (फर्निचर खरेदी 4 लाख व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रूपये)

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (रु.2.50 लाख) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (रु.2.00 लाख).

महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य (6.20 लाख  व इमारत विस्तार रुपये 10.00 लाख रूपये)

राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु.1.50 लाख रुपये 2.50 लाख/रु.3.00 लाख)

बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय “बाल कोपरा स्थापन” करण्याकरीता अर्थसहाय्य (रु.6.80 लाख).

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www-rrrlf.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे