सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे 21 जुलै रोजी करणार समृध्दी महामार्गाची पाहणी

जालना/प्रतिनिधी,दि. 20
राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे हे शुक्रवार, दि. 21 जुलै 2023 रोजी समृध्दी महामार्गाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. 21 जुलै रोजी सकाळी 8.45 वा. मुंबई येथून नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन. सकाळी 8.45 ते 9.30 वा. राखीव. सकाळी 9.30 वा. बैठक. सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 वा. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यास प्रारंभ (वायफळ टोलनाका ते मालेगाव टोल प्लाझा). दुपारी 1.30 ते 2.15 वा. राखीव. दुपारी 2.15 ते सायंकाळी 6.30 वा. मालेगाव टोल प्लाझा येथून पुनश: पाहणी दौऱ्यास प्रारंभ करुन भारविरपर्यंत आगमन व येथून इगतपुरीकडे प्रयाण. सोयीनुसार नाशिक मार्गे मालेगावकडे प्रयाण करतील.