आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानतर्फे शहरी बेघर निवारा केंद्रात दिवाळी पहाट साजरी

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि 10
आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शहरी बेघर निवारा केंद्र येथे दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. या उपक्रमात निवारा केंद्रातील सुमारे ४५ बेघर व्यक्तींना जेवण देण्यात आले.
या वेळी बेघर निवारा केंद्राचे डॉक्टर फारूक सर, आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. दिव्या पाटील, सचिव ज्ञानेश्वर देवडे, पुंडलिक भैया देवडे, कार्याध्यक्ष दादासाहेब जिगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. दिव्या पाटील म्हणाल्या, “तुम्हा आम्हा सर्व सामान्य लोकांना दिवाळीचे किती अनन्य साधारण महत्त्व असते ना पण ज्यांना कुणीच नाही,कसल्याही प्रकारचा आधार नाही अशा गरजू व्यक्तींसोबत दिवाळी पहाट साजरी करण्याचा आनंद अधिक आहे. आणि त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण प्रचंड प्रेरणादायी आहे.त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्यच आमच्यासाठी दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारे आहे.”यातून मिळणारे समाधान हीच माझ्या आयुष्यातील लाखमोलाची श्रीमंती आहे.



