महात्मा गांधी रोड ते रेल्वे स्टेशन सिमेंट रस्त्यावर विद्युत पोल हटवून दिशादर्शक झेब्रा क्रॉसिंग रंगीत पट्टे मारण्यात यावे- सौ संध्या संजय देठे

जालना/प्रतिनिधी, दि.20
महात्मा गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड नवीन अर्धवट सिमेंट रस्त्या झाल्यामुळे वाहतूक वाढली आहे मध्येच विद्युत पोल उभे असल्याकारणाने दररोज अपघात घडून अनेक लोक जखमी होत आहे व काही जण मृत्यू सुद्धा पावले आहे त्यामुळे सौ संध्या संजय देठे यांनी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री संतोषजी खांडेकर साहेब यांची प्रत्यक्षात महानगरपालिकेत भेट घेऊन वरील समस्या लेखी स्वरूपात व तोंडी स्वरूपात मांडली सदरील सिमेंट रोड हा अर्धवट अवस्थेत असून तो पूर्ण करणे व त्यावर रंगीत दिशादर्शक रेडियम पट्टे व झेब्रा क्रॉसिंग पट्टे लावण्यात यावे तसेच रोडच्या मधोमध डिव्हायडर लाईनला स्टडलाईट बसविण्यात यावे त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल व दररोज होणारे अपघात टळतील वरील प्रकरणी तात्काळ प्रशासकीय कारवाई करून काम पूर्ण करण्यात यावे यासाठी लेखी पत्र माननीय आयुक्त संतोष खांडेकर यांना सौ. देठे यांनी दिले आहे
—————————————————————
अर्धवट असलेला सिमेंट रस्ता पोल शिफ्टिंग निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच अर्धवट सिमेंट रस्ता पोल शिफ्टिंग कामाला सुरुवात होईल दिशादर्शक रेडियम पट्टे झेब्रा क्रॉसिंग कामासाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिकेमार्फत हे काम केले जाईल असे आयुक्त संतोष खांडेकर साहेब यांनी आश्वासन दिले
*आपली*
*सौ संध्या संजय देठे नगरसेविका/ जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना*



