अ.भा.भि.सं संघानुशासक भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर,यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निर्वाण.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.27
अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघानुशाशक तसेच नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी जालना चे संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी सकाळी [5:30am] साडेपाच वाजता महापरित्राण पाठ श्रवण करीत असता “अंतिम श्वास घेतला. भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती मध्ये संपूर्ण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून भगवान बुद्धाच्या बुद्ध शासनासाठी भरीव असे लेखन कार्य, धम्मकार्य केले आहे. त्यांच्या जाण्याने अखिल भारतीय भिक्खू संघ व समाजाची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांचा अंतिम संस्कार विधी गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजता [3:00 वा] स्थळ : नालंदा बुद्ध विहार, संघभुमी नागेवाडी ता. जिल्हा जालना भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्व उपासक उपासकांनी उपस्थित राहून पुण्य अर्जित करावे, असे आवाहन अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात शिष्य पूज्य भिक्खू धम्मधर शाक्यपुत्र व भिक्खू शिवली शाक्यपुत्र यांनी कळविले आहे.