pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सैनिक व त्यांच्या अवलंबितासाठी 5 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे आयोजन

0 1 2 0 8 0

जालना/प्रतिनिधी,दि.31

जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक व अवलंबितांसाठी महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सर्व तालुक्यात आजी -माजी सैनिकांसाठी महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उपक्रमाचा सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी सर्व कागदपत्रासह संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सर्व संबंधित तहसीलदार व महसूल विभागाचे कर्मचारी हे दि.5 ऑगस्ट 2023 रोजी आजी- माजी सैनिकांची महसूल संबंधित कामे करण्यासाठी तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. तरी शेतीच्या रस्त्यासबंधी, घरकुल, निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी संजय गांधी निराधार योजना, निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी श्रावण बाळ निराधार योजना, प्रलंबित फेरफार नोंदी महसूल संबंधी इतर तक्रारी, शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन, शिधापत्रिका, सातबारा आदि संदर्भातील महसूल कामांचा यात समावेश असणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 8 0