pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा-उन्द्री (प.दे.)ता. मुखेड बोर्डाचे अनावरण

स्व.गणेशराव पोलिस पाटील वडजे यांच्या पुण्यस्मरनानिमित्त हभप.राम महाराज पांगरेकर यांचे गुलालाचे किर्तन ;तालुक्यातील अनेक गावातील शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा

0 1 7 4 0 8

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.9

मुखेड
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा ऊंद्रि पदे ता. मुखेड बोर्डाचे अनावरण व स्व.गणेशराव शामराव वडजे पोलिस पाटिल यांच्या प्रथम पुण्यस्मरनानिमित्त गुलालाचे किर्तन हभप.राम महाराज पांगरेकर (सकाळी१०ते १२)
यांच्या अमृतवाणीने होनार तदनंतर आम्ही वारकरी परिवारातील तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड झालेल्या पदाधिकाऱ्याचा नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.11 जाने.2024 रोजी दुपारी 12.00 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण व मुखेड तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारीणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, श्रीरामजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील कपाटे,श्री दत्तराम पाटील एडके, सल्लागार श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी पा.जाधव,श्री रामराव पा.माने उपाध्यक्ष गंगाधर पा.हंबर्डे,सचिव -व्यंकटराव पा.माळकौठेकर सहसचिव प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थेचे सदस्य श्री प्रवीण रौतुलवाड,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर ,श्री त्रिमुख पा.येडके, जिल्हाप्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, अशोक वाघमारे जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख,
जिल्हाप्रसिद्धी कोषाअध्यक्ष रामभाऊ चन्नावार,तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असल्याची माहिती संयोजक मंडळी यांच्याकडून कळविण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्हा व तालुका शाखेतील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थित राहुन आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी व संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग हाच खरा मार्ग आहे हे स्विकारण्याठी आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्तिने जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे समजून घेण्यासाठी अशा महान प्रसंगी आपली उपस्थिती महत्वाची आहे.. नांदेड जिल्ह्यातील धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा बोर्डाचे अनावरण करण्यासाठी या संतसंग मेळाव्यात सर्व सदभक्तानी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष मारोतराव वडजे पाटिल ता.सचिव माधव गोजेगावे, श्रीपतराव महाराज,नागनाथ धुमलवाड,देवानंद कागने, शिवराज आटकुलवार,अमरदास वडजे,तुकाराम डांगे,हरिदास काळेवार,भागवत वडजे,
व ऊंद्रि पदे येथील शाखा अध्यक्ष यांनी केले आहे.
असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे