योगगुरु अर्चना सोनार यांना ‘रूग्वेद सुवर्णवार्ता ‘चा ” उत्कृष्ट निवेदिका सन्मान” –विविध संस्था,संघटनेच्या वतीनेअभिनंदन

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.13
पुणेः- येथील प्रसिध्द योगगुरु अर्चना सोनार यांना “रुग्वेद सुवर्णवार्ता “चा ‘उत्कृष्ट निवेदिका सन्मान’नुकत्याच नागपुर येथे संपन्न झालेल्या आदर्श वधु-वर परिचय मेळाव्या मध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याबद्दल विविध संस्था संघटनाच्या वतीने त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
सुवर्णकार वधु-वर समुह व रुग्वेद सुवर्णवार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय सुवर्णकार समाजाचा आदर्श वधु-वर परिचय मेळावा नागपुर येथे नुकताच संपन्न झाला.याप्रसंगी समाजात उत्कृष्ट निवेदनाचे कार्य करीत असल्याबद्दल पुणे येथील प्रसिध्द योगगुरु सौ.अर्चना सोनार व रुग्वेद सुवर्णवार्ता साठी कार्यरत मेहकर येथील कार्यरत निवेदिका सौ.दिपाली भांडेकर यांना “सुवर्णवार्ता उत्कृष्ट निवेदिका सन्मान ” मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर प्रदान करण्यात आला.
हा ‘उत्कृष्ट निवेदिका सन्मान ‘प्राप्त झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड पुणे येथील प्रसिध्द योगगुरु व स्त्रीशक्ती फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांच्या सामाजिक कार्याच्या आढाव्यानुसार गजानन महाराज मंदीर,जुनी सांगवी,पुणे येथील आयोजित भजनसेवा कार्यक्रमात फ्रेंड्स योगा ग्रुप ,ज्ञानाई महिला भजनी मंडळ तसेच स्त्रीशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.त्यामध्ये प्रामुख्याने सौ.वैशाली जाधव,सौ.निता बागडे,सौ.दर्शना शेटे,सौ.कल्पना पाटील,सौ.मीना आवटी,सौ.प्रतिभा गुरव ,सौ.कुमुदिनी अटाळे,सौ.ज्योती जोशी,सौ.जयश्री मगदुम,सौ.अंजली सराफ,सौ.वंदना मोटे,सौ.वंदना कांबळे,सौ.शितल संकपाळ,सौ.राधिका डांगे,सौ.छाया कुंभार,सौ.वैशाली मोरे,सौ मीरा दळवी,सौ.ललिता भोळे सौ.वनिता बागुल,श्रीमती सीता सोमवंशी आदींचा समावेश होता.त्यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.