शासनाच्या विविध योजनेचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.13
कृषि विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात दि. 1 डिसेंबर 2024 रोजी पासुन अग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यात येत असुन शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज करण्यात येत आहे. सद्यस्थितीत कॉमन सर्विस सेंटर/नागरी सुविधा सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांची नोंदणी सुरु आहे. तरी शासनाच्या विविध योजनेचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये शेतकऱ्यांना अद्वितीय ओळख क्रमांक मिळतो. ज्यामध्ये त्यांचे आधार क्रमांक व जमिनीचा सातबारा याची माहिती समाविष्ट असते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसंदर्भात शेतात घेतलेली हंगामी पिके, त्यांचे भौगोलिक स्थान यांची एकत्र माहिती पाहता येते, तसेच कृषि विषयक संसाधनाचा वापर योग्य रितीने वापर करणे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ, हवामान अंदाज, मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो. तर पीक विमा योजनेचा लाभ सोपा होतो. डिजीटल पीक कर्ज मिळवणे सोपे होते, या करीता सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घेणे आवश्यक आहे.
-*-*-*-*-