डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात

जालना/प्रतिनिधी,दि.2
भारतीय डाक विभागातर्फे नवीन “ज्ञान पोस्ट” ह्या सेवेची सुरुवात दिनांक 1 मे पासून करण्यात आलेली आहे. ह्या सेवे अंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज, पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दारात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे.
“ज्ञान पोस्ट” या नवीन मेल उत्पादनाची ओळख
आढावा आणि उद्देश – ज्ञान पोस्ट हे टपाल विभागाच्या मेल सेवांतर्गत एक नवीन उत्पादन असेल, ज्याद्वारे प्रेषक विशिष्ट पुस्तके आणि अध्ययन साहित्य टपाल कार्यालयाद्वारे पाठवू शकेल.
वैशिष्ट्ये -“ज्ञान पोस्ट” या नवीन उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः ऑनलाईन ट्रैकिंग सेवेद्वारे वस्तूचे ट्रॅक व ट्रेस करणे. पत्त्यानुसार विशिष्ट सेवा. पोस्टिंगचा पुरावा (पोस्टिंग पावती) प्रेषकास दिला जाईल. वितरणावेळी स्वाक्षरीनिशी मिळण्याचा पुरावा (विनंतीनुसार). या वर्गाअंतर्गत नोंदवलेले पार्सल्स भूपृष्ठ मार्गे (surface mode) पाठवले जातील.”ज्ञान पोस्ट” अंतर्गत पार्सल बुकिंगसाठी किमान वजन 300 ग्रॅम आणि कमाल वजन 5 किलो असेल. हे उत्पादन टपाल कार्यालयाच्या काउंटरवर किरकोळ बुकिंगसाठी उपलब्ध असेल.
प्रेषकासाठी इतर महत्त्वाच्या सुविधा – पोस्ट केलेल्या टपाल वस्तूचा प्रेषक जेथे “प्रेषक” असा उल्लेख आहे तेथे प्रेषक म्हणून विचार करण्यात यावा. पुढील अटींच्या अधीन राहून ती वस्तू पोस्टमधून मागे घेऊ शकतो किंवा तिचा पत्ता बदलू शकतो. जर ती वस्तू अद्याप प्राप्तकर्त्याच्या वितरणासाठी इनव्हॉईस केलेली नसेल. जर ती वस्तू देशातील कोणत्याही कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली नसेल. प्रेषक अतिरिक्त शुल्क भरून वस्तू परत मागवू शकतो, जर ती वस्तू अद्याप वितरण कार्यालयात वितरणासाठी इनव्हॉईस केलेली नसेल. तरी सर्वांनी “ज्ञान पोस्ट” ह्या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मोहम्मद खदीर, अधिक्षक, परभणी विभाग यांनी केले आहे.