जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.11
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, म. रा. पुणे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जालना मार्फत जालना जिल्हयामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होणेसाठी खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणेसाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास तसेच अद्यावत प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन दि. 14 ऑगस्ट 2023 ते दि. 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत सकाळी 7.00 ते 9.00 आणि सांयकाळी 5.00 ते 7.00 वा या कालावधीत 01) खो-खो या खेळाचे कै. नानासाहेब पाटील विद्यालय, नजिक पांगरी, ता. बदनापूर जि. जालना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, आनंदनगर, जालना, 02) फुटबॉल या खेळाचे जिल्हा क्रीडा संकुल, जालना व आर. पी. इंग्लीश स्कुल, अंबड, ता. अंबड, जि. जालना या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास व नविन विद्यार्थी खेळाडूंना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी फुटबॉल व खो-खो खेळाच्या प्रशिक्षण शिबीरांचे करण्यात आले आहे.
सदर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत अद्यावत प्रशिक्षण शिबीरात खो-खो व फुटबॉल या खेळाच्या जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हयाचे नाव लौकिक करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.