pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व कार्यशाळा संपन्न

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.15

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण,जालना व लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ, बहाद्दरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा व त्यांना ओळखपत्र देण्यासाठी नाव नोंदणी कार्यक्रम दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन जालना येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, सहायक लेखाधिकारी गुलाब चव्हाण, कार्यालय अधिक्षक अतिश ससाने, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गणेश अंभोरे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत तसेच नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ, बहाद्दरपुरा संस्थेचे पदाधिकारी संजय कावळे, कपिल वाघमारे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व थोर पुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार तृतीयपंथीयांचे गुरू काजल शफी बकश यांच्या हस्ते अर्पण करुन झाले. यावेळी जालना जिल्ह्यातील एकुण 32 तृतीयपंथी या कार्यक्रमास उपस्थित होते. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीने तृतीयपंथीयांना विशेष बाब म्हणुन घरकुल बांधुन देण्याबाबत श्रीमती प्रणिती भिसे यांनी विनंती केली. कार्यक्रमात उपस्थित सर्व तृतीयपंथीयांची जिल्हा शल्य चिकीत्सक, जालना यांच्या कार्यालयामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना ऑनलाईन केलेल्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार मुख्याध्यापक डॉ.दिलीप गिरी यांनी मानले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे