pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू

0 1 7 9 4 0

जालना/प्रतिनिधी,दि.7

 जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.  जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील 101- जालना, 102 – बदनापूर व 103 – भोकरदन या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मतदान केंद्र व परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

 मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मतदारांच्या गर्दीचा फायदा घेवून मतदान प्रक्रियेस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न समाजकंटक लोकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय, शांतातमय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता तसेच जालना जिल्ह्यातील 101 – जालना, 102- बदनापूर व 103 – भोकरदन या विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदान साहित्यासह मतदान पथक दि. 12 मे 2024 रोजी पोहचणार असून त्यांच्या जवळील ईव्हीएम, व्ही.व्ही. पॅट व इतर संवेदनशिल साहित्य राहणार आहे. त्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जालना जिल्हयातील 101 – जालना, 102 – बदनापूर व 103 – भोकरदन या विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राचे ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागु करणे आवश्यक झाले आहे.  त्याअर्थी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानूसार जालना जिल्ह्यातील 101 – जालना, 102- बदनापूर व 103- भोकरदन या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात खालीलप्रमाणे कृती करण्यास मनाई करण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशानूसार मतदान केंद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परिसरात प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, मतदारांना अमिष दाखवणे, मतदारांना मतदान करण्यापासुन रोखणे, धुम्रपान करणे, ज्वलनशील पदार्थ नेणे.  मतदान केंद्रापासुन 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो तसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा चालविणे.  100 मीटर प्रतिबंधित त्रिजेच्या क्षेत्राचे बाहेरील भागावरून ध्वनिक्षेपकांचा असा वापर करणे की, ज्यामुळे मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि मतदानासाठी येणारे मतदार यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यामध्ये बाधा निर्माण होणार नाही.  मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणने.  मतदारांना ने-आण करण्यासाठी अनाधिकृतपणे वाहनांचा वापर करणे.  मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात राजकीय नेत्यांचे फोटो, चिन्ह वापरणे आणि घोषणा करणे.  मतदान केंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात हॉटेल, टेलीफोन बुथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांनी व्यवसाय करणे. आदि बाबींना मनाई करण्यात आली आहे. सदरचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीची कर्तव्य बजावणारे सर्व अधिकारी-कर्मचारी, कायदा सुसुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे मतदारांना लागु राहणार नाही. हा आदेश दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासुन ते दि. 13 मे 2024 रोजीचे 24  वाजेपर्यंत लागु राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे