pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि. 22

आयुक्त तथा संचालक अध्यक्ष निवड समिती नगर परिषद, प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट – क परीक्षा दि. 22 नोव्हेंबर 2023 व दि. 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पाथ्रीकर कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर – जालना हायवे, बदनापुर, जि. जालना या परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/ फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.
वरील परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत नमुद परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात येत आहे. हा आदेश वरील परीक्षा कालावधीत सकाळी 8.00 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे