pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संभाजीनगर येथील मूल्यसंस्कार मेळाव्याच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येत मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा उत्साहात संपन्न

वृद्धाश्रम मुक्त भारत अभियानांतर्गत राबवलेला स्तुत्य उपक्रम

0 1 7 4 0 8

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.27

27 नोव्हेंबर 2023 रोजी संभाजीनगर येथे मूल्यसंस्कार मेळावा व मातृ पितृ पूजन सोहळ्यास उत्साहपूर्ण वातावरणास संपन्न झाला.
दिनांक 26 व 27 या दोन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून मूल्यसंस्कार विभागाच्या वतीने मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विविध विषयावरील ज्ञानदालनांचे गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा, गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ, आदरणीय आमदार श्री संजय शिरसाठ, आदरणीय आमदार श्री प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदघाटन झाले.
कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या विविध ज्ञानदालनांना अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भेट दिली. कार्यक्रमस्थळी ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर ,नोकरी बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण दुर्गसंवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी अशी अनेक वैविध्यपूर्ण ज्ञानदालन सर्वांसाठी आकर्षक ठरली.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी गुरूपुत्र आदरणीय श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहसंस्कार विभागाच्या वतीने तुलसी-दामोदर विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या पावन क्षणी उपस्थित भाविकांना परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या मौलिक हितगुजातून मार्गदर्शन केले.वृद्धाश्रम ही संकल्पना भारतीय संस्कृतमध्ये मान्य नाही असे परखड मत मांडताना परमपूज्य गुरूमाऊलींनी मुल्यसंस्कार अभियान तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले. 20% अध्यात्म आणि 80 % समाजकार्य या सुत्रातून सेवाकार्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाच्या कार्यप्रणाली विषयी अमृततुल्य हितगुज केले. या ऐतिहासिक उपक्रमास छत्रपती संभाजीनगर मधील आ. प्रशांत बंब, आ. संजय सिरसाट, अ‍ॅड. सचिन डंख इत्यादी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे