pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात मास टाकणारा आरोपी गजाआड

0 3 8 6 5 3

भोकरदन/ संजीव पाटील,दि.23

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदीरात मास टाकणारा आरोपीला अटक करण्यास आज अखेर पोलिसांना यश आले. महादेव मंदिराच्या शेजारीच घर असणारा आन्वा येथील रहिवासी नंदकिशोर सुरेश वडगावकर वय वर्षे 38 यास पोलीसांना ताब्यात घेतले असून नंदकिशोर यांने गुन्हा ची कबुली दिली आहे. अशी माहिती पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी दिली. घर बांधकामांसाठी परवानगी मिळत नसल्याने आणि इतर कारणांमुळे त्यांने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गु.र.न.228/25 भा.द.वि.कलम 298 अन्वे दाखल करण्यात आला होता . जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक निपाणी ,यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी.बी.चे खट्टेकर ,भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर, भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बिडवे,पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने हे पुढील अधिक तपास करीत आहे. आरोपीच्या अटके साठी आन्वा गाव बंद , ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सी.सी.टी.व्ही फुटेज वरुन तपास करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे