जन्मबंधच्या मेळाव्यात सोनार ऐक्यासाठी सर्वांनी, शाखाभेद सोडुन कार्य करावे
मान्यवरांचे भाषणातून प्रतिपादन

वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे,दि.7
पुणेः जन्मबंध फाउंडेशन च्या विवाहसंस्था व घटस्फोट तंटानिवारण शिखर समिती,पुणे विभागीय कार्यालयाचे उद् घाटन व सहविचार स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.या मेळाव्यात सोनार ऐक्यासाठी सर्वांनी शाखाभेद सोडुन कार्य करावे.असे मान्यवरांनी आपल्या भाषणात निर्धार व्यक्त केला.
जन्मबंध फाउंडेशन अंतर्गत विवाहसंस्था व घटस्फोट तंटानिवारण शिखर समिती पुणे विभागीय कार्यालयाचे उद् घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन्मबंधचे संस्थापक प्रभाकर मोरे हे होते.प्रमुख वक्ते जि.प.परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे (आय ए एस) तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार,नायब तहसिलदार सौ.शुभदा पंडीत (पुणे),शिखर समिती विदर्भ अध्यक्ष अंनतराव उंबरकर(नांदुरा),सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विलासराव अनासने,अॕड.शाम प्रसाद बेगमपुरे(सातारा),अॕड.पुजा शहाणे (बीड),सौ.विद्याताई सोनार,प्रा.जीवन जगदाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जन्मबंधच्या प्रारंभीच्या कार्यापासुन ते आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा संस्थापक प्रभाकर मोरे यांनी दिला.नाशिक येथे भव्य मेळावा आयोजनाचा मनोदय व्यक्त करुन घटस्फोट व तंट्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांनीही ‘महिला ब्रिगेड’मध्ये सामील व्हावे असेही आवाहन त्यांनी अध्यक्षीय समारोपात केले.तसेच समाजात भांडण,तंटे व घटस्फोट होऊ नयेत यासाठी विविध माध्यमातून कार्य असावे तर ‘तंटामुक्ती समिती’मध्ये विविध तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेऊन या बाबीवर आळा घालावा.तसेच सोनार ऐक्य झाले पाहिजे व शिक्षणावर भर देण्याचे देखील गरजेचे आहे.विविध बाबीवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय सुवर्णकार समाजसंमेलनाचे आयोजन व्हावे.अशा अनेक बाबीवर मान्यवरांनी आपल्या भाषणातुन विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रामुख्याने ‘देवी अहिल्या महिला मंडळाच्या ‘महिला इंदौर(म.प्र.)येथुन आवर्जून उपस्थित होत्या.त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या मंडळाच्या अध्यक्षा सोनाली सोनार यांनी जन्मबंधच्या कार्याचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अॕड.राजन दिक्षीत यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली.संयोजकातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय काजळे यांनी व्यासपीठावर एक सामाजिक कविता सादर केली.तर प्रभाकर गळंगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सुत्रसंचलनआशिष जरड यांनी सांभाळले.शेवटी प्राचार्य श्रीकांत सोनवणे यांनी केले.या कार्यक्रमास महाराष्ट् तसेच विविध प्रदेशातील पदाधिकारी उपस्थित होते.