उरणमधील रोजगार मेळाव्याचा बेरोजगारांनी घेतला मोठया प्रमाणात लाभ

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व श्री. अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता. उरण. (कृ.द. जोशी सभागृह) येथे भव्य दिव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास बेरोजगारांसह पालकांचाही या मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.उरण तालुक्यात त्यातही ग्रामीण भागात पहिल्यांदाच बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी २३३ उमेदवारांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ८२ इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, कौशल्य बघून एकूण ३० जणांची नोकरी साठी निवड झाली आहे.
विविध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लिंक द्वारे नाव नोंदणी केली होती. ते विद्यार्थी मोठया प्रमाणात रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते.मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात आले आहेत . या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवाऱ्याच्या नोंदणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.सदर सुवर्णसंधीचा संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात घेतला.रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता. उरण. (कृ.द. जोशी सभागृह) येथे हा रोजगार मेळावा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.यावेळी व्यासपिठावर लायन्स क्लबचे एम डी अध्यक्ष अमरचंद शर्मा,जिल्हाध्यक्ष आर एन रामेश्वरन, उपाध्यक्ष संजीव सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रविण सरनाईक, विभाग प्रमुख सुयोग पेंडसे, यशस्वी ग्रुपचे एस जी चव्हाण, सचिव अशोक मिलडा, प्रोजेक्ट को ओरडीनेटर के. एस. पाटील, उरण अध्यक्ष ज्ञानेश्वर कोठावदे,द्रोणागिरी अध्यक्ष सागर चौकर, अविनाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सामाजिक कार्यकर्ते जीवन गावंड, सुधाकर पाटील, मुकुंद गावंड, के एस पाटील, चव्हाण सर, शर्मा सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन अमित पाटील यांनी, प्रस्तावना अविनाश म्हात्रे यांनी केले तर आभार विनोद डाकी यांनी मानले.सदर बेरोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे व मित्र परिवार (पाले), पूर्व विभागातील विविध सामाजिक संस्था संघटना, सामाजिक कार्यकर्ते,पिरकोन मधील श्री गणेश महिला बचत गट यांनी विशेष मेहनत घेतली.