pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कन्यादान योजना, संस्था व पालकांना अर्ज करण्याचे आवाहन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 22

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र दाम्पत्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येते.
या योजनेनूसार सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून आपल्या कन्येचा विवाह करणारे वधूचे वडील, आई किंवा पालक यांच्या नावे 20 हजार रुपये अनुदान क्रॉस चेकने देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति पात्र जोडपे 4 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. तसेच वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
सन 2023-24 या वर्षासाठी सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या जास्तीत जास्त स्वंयसेवी संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे प्रस्ताव सादर करावेत. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जालना कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र व्यक्ती व संस्थांनी कन्यादान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles

Leave a Reply