जेएनपीटीच्या कामगारांसाठी महेंद्रशेठ यांची प्रशासनासोबत चर्चा
महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे कामगारांच्या आशा पल्लवित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
जेएनपीटीत गेल्या २५-३० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने भूमिपुत्र कामगार काम करतात, पण त्यांना कमी पगारात राबवून घेतले जाते आणि आजही वेळेवर पगार मिळत नाही, अशी व्यथा या कंत्राटी कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे साधारण पंधरा दिवसांपूर्वी मांडली होती.
तेव्हा कंत्राटी कामगार महेंद्रशेठ यांना म्हणाले होते, “आम्ही अनेकांच्या नेतृत्वाखाली काम केले, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे महेंद्रशेठ तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, तुम्हीच आमचे नेतृत्व करा, आम्ही आपल्यासोबत आहोत.”
त्यामुळे न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सुमारे ४०० कंत्राटी कामगारांचे नेतृत्व स्वीकारले आणि कामगारांना न्याय देण्याचे मान्य केले.
त्यामुळेच तातडीने आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता.१३) जेएनपीटीच्या कंत्राटी कामगारांसाठी पुढाकार घेऊन प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी जेएनपीटीच्या महाप्रबंधक मनीषा जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला आणि लवकरात लवकर कामगारांचे प्रश्न सोडवा, असे महेंद्रशेठ घरत यांनी मनीषा जाधव यांना सांगितले. त्यावेळी कंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होईल, तसेच इतर मागण्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन मनीषा जाधव यांनी दिले.
यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेत पदार्पण केलेले हरेश मढवी, मिन्नाथ भोईर, अविनाश घरत, संजय घरत, नंदू कोळी, अजय पाटील, जितू म्हात्रे, सचिन भोईर, योगेश कोळी, किरण भोईर, योगेंद्र ठाकूर, दत्ता कोळी, जालिंदर पाटील, कल्पेश नारंगीकर, नितीन नाईक, राकेश कडू, जयेश पाटील, जयेश घरत, ज्योत्स्ना ठाकूर, बाळकृष्ण मोकल, पुष्पा पाटील, विलास कडू, सुवर्णा कडू, शिल्पा म्हात्रे, सुषमा म्हात्रे, जयश्री ठाकूर, प्रतिभा कडू, नलिनी तांडेल, संदीप घरत, सुभाष गावंड, विनया मढवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.