pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

परप्रांतीय बिल्डर कडुन स्थानिक भूमीपुत्र असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक.

जमिनीचे व्यवहार करून शेतकऱ्यांना पैसे दिलेच नाही,परप्रांतीय बिल्डर मुळे मूळ स्थानिक शेतकरी लागला देशोधडीला.

0 1 1 8 1 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

पनवेल, पेण जि. रायगड येथील शेतकऱ्यांची जमिन खरेदी व्यवहार करून शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत पनवेल व पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रमेश रामदुलार यादव, यादव कॉम्पेक्स प्लाट नं A / 53 सेक्टर 14, महाराष्ट्र शाळेजवळ कळंबोली,पनवेल. जि. रायगड यांच्या विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करून ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी फसवणूक झालेले शेतकरी दिगंबर यशवंत पाटिल पत्ता रा. पो. रावे ता. पेण जि. रायगड,तुकाराम शंकर माली पत्ता रा. केळवणे ता. पनवेल जि. रायगड,लक्ष्मण गणाजी भोईर पत्ता रा. कोपर ता. पेण जि. रायगड, विष्णु दत्तु ठाकूर पत्ता रा. पो. रावे ता. पेण जि. रायगड, गणेश जाणा कोळी पत्ता रा. केळवणे ता. पनवेल जि. रायगड, वैभव कृष्णा पाटिल पत्ता रा. केळवणे ता. पनवेल जि. रायगड, यशवंत जाना कोळी पत्ता रा. केळवणे ता. पनवेल जि. रायगड, मंदा अमृत गुजर पत्ता रा. साई श्रध्दा, कात्राक रोड वडाला मुंबई यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, कोकण आयुक्त, अंमल बजावणी संचालनालय (ED ), जिल्हाधिकारी रायगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, प्रांतधिकारी पनवेल, तहसीलदार पनवेल यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.जर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळाली नाही,शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर दिनांक 28 ऑगस्ट 2023 पासून कोकण आयुक्त कार्यालय (कोकण भवन ) सिबिडी बेलापूर, नवी मुंबई येथे पीडित सर्व शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

रमेश रामदुलार यादव यांनी उरण,पनवेल, पेण तालुक्यातील अनेक शेत जमिनी विकत घेतल्या. मात्र ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. अनेक शेतकऱ्यांचे 30 लाख,40 लाख असे व्यवहार जमिनी संदर्भात झाले असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र 5 लाख, कोणाला 10 लाख तर कोणाला 15 लाख मिळाले आहेत. पीडित शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलीच नाही.शिवाय बिल्डर रमेश यादव यांनी शेतकऱ्यांना दिलेले चेक सुद्धा बाऊन्स झालेले आहेत.शेतकरी त्या बिल्डर कडे अनेक वर्षे झाले फेऱ्या मारत आहेत मात्र त्यांना आजपर्यंत पूर्ण रक्कम मिळालेली नाही.जागोजागी जमिनीचे व्यवहार करायचे, कागदपत्रे बनवायचे, सातबारा आपल्या नावावर करायचे मात्र पूर्ण पैसे द्यायचे नाहीत. व शेतकऱ्यांना खोटे बोलून पळून जाणे, फोन न उचलने, शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे, शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक करणे असे अनेक तक्रारी बिल्डर रमेश यादव यांच्या विषयी शेतकऱ्यांनी केली आहे.

———————————————–
रमेश रामदुलार यादव यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक केवळ अर्जदारांपुरती मर्यादित नाही. असे फसवणूक झालेले शेकडो शेतकरी पेण, पनवेल, उरण तालुक्यात परिसरात आहेत.सीलिंक, नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी सिडको प्रकल्पामुळे गुंठ्याला 5 ते 6 कोटी रुपये भाव आल्यामुळे रमेश रामदुलार यादव यांच्यासारखे भूमाफीया शेतक-यांची प्रचंड फसवणूक करित आहेत. सध्या जागेचा ताबा शेतकऱ्यांकडेच आहे. जमिनीचा पूर्ण मोबदला न देता पॉवर ऑफ ऍटरनी नुसार एजंटचा मार्फत मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. तरी नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि ईडी, पोलीस यांच्यापर्यंत गुन्हा नोंद करून शेतकऱ्यांना न्याय दयावा अन्यथा 28 ऑगस्ट 2023 पासून कोकण आयुक्त कार्यालयासमोर ज्यांची फसवणूक झाली असे सर्व शेतकरी, त्यांचे कुटुंबिय आमरण उपोषणास बसणार आहेत.
– दिगंबर पाटील
फसवणूक झालेले शेतकरी , रावे, पेण

मी कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली नाही. मी कोणालाही त्रास दिलेला नाही.
– रमेश रामदुलार यादव, बिल्डर,कळंबोली पनवेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 3