बदली झालेल्या शिक्षकांच्या नोंदी तात्काळ घ्या: प्राथमिक शिक्षक संघ.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
जाफराबाद तालुका अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेमध्ये नोंदी घेण्यासह नव नियुक्त शिक्षण सेवकांचे सेवा पुस्तक तात्काळ तयार करण्याची मागणी जाफराबाद तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी जाफराबाद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जाफराबाद तालुक्यातील ऑन लाइन बदली झालेल्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेमध्ये बदलीची नोंद घेण्यात यावी,यासह यावर्षात तालुक्यात नव्याने आलेल्या शिक्षण सेवकांच्या सेवा पुस्तके तात्काळ तयार करण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या.निवेदनावर तालुकाध्यक्ष विनोद कळंबे, नेते दिपक चव्हाण, सरचिटणीस सतीश राऊत, कार्यकारी अध्यक्ष किशोर मुरकुटे, उपाध्यक्ष संदीप कदम, कार्याध्यक्ष सुनील पवार, संपर्क प्रमुख अनंता जंजाळ यांनी केले आहे.

