ब्रेकिंग
संगणक शिकता शिकता कमवा योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार प्रमाणपत्र
0
3
2
1
8
2
जालना/प्रतिनिधी,दि. 27
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत “सर सेनापती वीर पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना” सुरू केली आहे. या योजने अंतर्गत संगणक ज्ञानाच्या माध्यमातून जनतेची सहभागी विद्यार्थ्यांना विविध कामे करण्याचा (उदा अधार कार्ड काढणे, पॅन कार्ड काढणे इ.) उपक्रम राबविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 28 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
0
3
2
1
8
2