गुरु रविदास सामाजिक सेवा संस्था उरण तर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
भारतातील थोर समाज सुधारक, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती गुरु रविदास सामाजिक विकास संस्था उरण यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उरण शहर येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ सल्लागार रामचंद्र लोखंडे यांनी केले तर समाजसेवक तथा उद्योगपती अतुल चांदोरकर यांनी दिप प्रज्वलन केले. गुरु रविदास सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब अवसरे यांनी प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जितेंद्र केळकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष दशरथभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष गणेश जळगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संत शिरोमणी गुरु रविदास यांनी समाजातील वाईट रूढी, वाईट परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान कशा प्रकारे दूर केल्या, समाज प्रबोधन कशा प्रकारे केले याची माहिती उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिली. तदनंतर महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. एकंदरीत उरण मध्ये संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती उत्सव व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरु रविदास सामाजिक विकास संस्था उरण चे अध्यक्ष बाळासाहेब अवसरे, कार्याध्यक्ष दशरथ चव्हाण, उपाध्यक्ष गणेश जळगावकर, उपाध्यक्ष अतुल चांदोरकर, सचिव जितेंद्र केळकर, सहसचिव अर्जुन साबळे, खजिनदार नरेंद्र काकडे, सहखजिनदार सागर नाचणकर,सल्लागार – अशोक ताचतोडे, किशोर खुणे, संदीप चव्हाण, भगवान देवरे, रामचंद्र लोखंडे, प्रविणकुमार वसईकर, समीर केळकर यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.