pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आपत्ती व्यवस्थापन पथकात सर्पमित्रांचा समावेश करा; निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0 3 2 1 7 8
जालना/प्रतिनिधी,दि.11
जालना जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाच्या आपत्कालीन पथकात सर्पमित्रांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात दि. 11 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत शासनाचे एनडीआरएफचे पथक मदत कार्य करीत असते. परंतु, एखाद्या वेळेस साप अथवा हिंसक पशु किंवा प्राणी निघाल्यास एनडीआरएफ पथकाचे काम थांबते, अशा परिस्थितीत सर्पमित्र किंवा प्राणीमित्र पथकात असल्यास मतदकार्य नियमित सुरु राहते. त्यामुळे निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने एनडीआरएफ च्या पथकात सर्पमित्रांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
त्याच बरोबर नागरीकांना सापांची आणि प्राण्यांची माहिती व्हावी यासाठी जालना येथील कन्हैयानगरच्या वनविभागात प्राणी संग्रहालय व सर्प उद्यान सुरु करण्यात यावे, एनडीआरएफ च्या पथकात प्रत्येकी दोन सर्पमित्रांचा समावेश करण्यात यावा. शहरात अथवा ग्रामीण भागात साप निघाल्यास सर्पमित्रांना बोलविण्यात येते, अशा वेळी त्यांना जाण्या-येण्याचा खर्च म्हणून शासनामार्फत कॉल चार्ज देण्यात यावा. सर्पमित्रांची बैठक घेऊन त्यांना नियम आणि सुचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात यावेत व साप सोडण्यासाठी राखीव जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्पमित्र म्हणून नव-नवीन मुलं-मुली साप हाताळतात, त्यांना सापाची पुरेशी माहिती नसल्याने सर्पदंश होण्याची आणि त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तज्ञ सर्पमित्र आणि वनविभागाच्या नियंत्रणाखाली सर्पमित्रांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी. शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयात साप आणि प्रजाती यावर अभ्यास समाविष्ट करण्यात यावेत. वन विभागात साप सोडताना सर्पमित्रांनी सोडलेल्या सापाची नोंद घेण्यात यावी. पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण अधिक असते. सापाबद्दल माहिती नसल्याने सापाला मारुन टाकले जाते. त्यामुळे सापाच्या जाती नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी सापाची माहिती देण्यासाठी सर्प जनजागृती करण्यात यावी व त्यासाठी स्वत्रंत निधी देण्यात यावा. जखमी वन्यजिव व प्राण्यांना पशु रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका तसेच घटनास्थळीच जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी वन विभागाकडून फिरता दवाखाना उपलब्ध करुन देण्यात यावा. जालना जिल्ह्यातील वन्यजिव अभ्यासक, प्राणीमित्र, सर्पमित्र, वन विभागाचे अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, खाजगी पशु वैद्य यांची एकत्रीत बैठक व कार्यशाळा घेऊन वन्यजिव वाचविण्यासाठी जखमी वन्यजिवावर मोफत उपचार करुन देण्यासाठी योग्य त्या सुचना देण्यात याव्यात. आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अच्युत मोरे, विशाल गायकवाड, मयुर साबळे, शिवाजी डाखुरकर, गोकुळ लाड, तेजस्वीनी चत्रे, गोपिनाथ ढोले, नासीर शेख, रंगनाथ खरात, अजय शिंदे, राहुल शिंदे, अजय नवगीरे यांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे