संपादिका सौ.किरण वाघ यांना आंतरराष्ट्रीय दर्जेचा साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर
ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन निमित्त पुरस्कार सोहळा.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.23
देऊळगाव राजा तालुक्यात आपल्या पत्रकारितेचा आगळा वेगळा ठसा उठावीत सामाजिक शैक्षणिक राजकीय असे विविध क्षेत्रात निर्भीड आणि पक्ष पत्रकारिता करून आपला नाव लौकिक करणारे सौ किरण संजय वाघ यांना आंतरराष्ट्रीय दर्जेचा साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षीओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन राज्यात राजकीय सामाजिक पत्रकारिता आणि शैक्षणिक विभागात उत्कृष्ट काम करणारे लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते येणाऱ्या दिनांक ३ मे रोजी साईबाबाची नगरी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकार तथा संपादिका किरण संजय वाघ यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले नाव लौकिक करत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना साई कलारत्न समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप : एक फुटाची भव्य व दिव्य ट्रॉफी, एक सोनेरी मेडल, कोल्हापूरी फेटा, एक साई चे नाव ओम साई लिहीलेली भगव्या रंगाची शाल, सन्मानपत्र, गुलाब पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा चे जालना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.