pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पोर्ट ऍण्ड डॉक कामगारांच्या वेतन कराराच्या बैठकीत सकारात्मक चर्चा.

0 1 1 8 2 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

मान्यता प्राप्त महासंघाच्या वेतन कराराच्या बाबतीत महत्वाची बैठक विशाखापट्टणम येथे मोठया उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत वेतनकरार समितीचे चेअरमेन, मुंबई पोर्टचे चेअरमन राजीव जलोटा , जेएनपीए बंदराचे चेअरमेन संजय शेटी, इतर बंदराचे सर्व चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर,कामगार महासंघाचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वच मुदयावर सविस्तर पणे चर्चा झाली. कामगारांना मिळणारे सुख सुविधा यावरही सकारात्मक अशी चर्चा झाली. सध्या कामगारांना सुरु असलेल्या सुख सुविधा आहे तशाच पुढे कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात यावर सर्वांचे एकमत झाले.तसेच भारतीय मजदूर संघातर्फे 11 जुलै 2023 देशभर झालेल्या आंदोलनाची दखल घेत व महासंघाच्या मागणीचा विचार करून बक्षी कमिटीच्या मागण्या अमान्य करण्यात आले.

बक्षी कमिटीच्या अहवालाला (कराराला) सर्व कामगार प्रतिनिधिंनी जोरदारपणे विरोध केल्याने बक्षी कमिटीचा अहवाल (करार) रद्द करण्यात आला. यावेळी क्लास वन, क्लास टू ऑफिसरना मिळणारी कॅफेटेरियाची सुविधा सर्वच कामगारांना (क्लास-3, वलास-4) कामगारांनाही मिळावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील यांनी केली.विविध मुदयावर सकारात्मक चर्चा झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.31 ऑगस्ट 2023 व 1 सप्टेंबर 2023 रोजी मान्यताप्राप्त 6 महासंघाचे बैठक दिल्ली येथे घेण्यात येणार आहे. या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्या व समस्या वर सविस्तरपणे चर्चा होणार आहे. व महत्वाचे निर्णय सुद्धा घेतले जाणार आहेत. अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव तथा वेतन करार समितीचे सदस्य सुरेश पाटील यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2