अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी 15 मे रोजी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड

जालना/प्रतिनिधी,दि.9
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सदर योजनेतंर्गत एकुण 25 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येणार असून, पात्र बचतगटांपैकी मंजुर उद्दिष्टाच्या अनुषंगाने 25 बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर डकविण्यात आली आहे.
तरी सर्व बचतगटांना दिनांक 15 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.