देविदास शिंपले यांचे निलंबन मागे घ्या मराठवाडा शिक्षक संघाची उपसंचालकांकडे मागणी

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.17
शिक्षक देविदास शिंपले यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे
परभणी येथील ज्ञानोपासक विद्यालय टाकळी तालुका मानवत येथील शिक्षक देविदास शिंपले यांनी समाज माध्यमावर सरकार विरोधात टीका केली म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी निलंबित करावे असे आदेश काढले आहे.
शिक्षणधिकारी (मा) जि प परभणी यांनी देविदास शिंपले (सहशिक्षक) ज्ञानोपासक विद्यालय रामेटाकळी ता मानवत जि परभणी यांचे तत्काळ निलंबन करावे असे आदेश दिले आहे. समाजमाध्यमांवर बदनामी करणे, सरकारी धोरणावर टीका करने व शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणे अशी कारणे दिलेली आहेत.
स्वतंत्र भारतात शिक्षणाधिकारी यांचे आदेश म्हणजे रजाकारी आहे. टीका करणे मागणी करणे हे राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. या निर्णयामुळे त्या मूलभूत अधिकारावर गदा आणली गेली आहे.
व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारे शिक्षणाधिकारी परभणी यांचे पत्र तात्काळ रद्द करावे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. अशा पत्रामुळे नवीन पायंडा पडेल आणि कर्मचाऱ्यांना याचा मानसिक व आर्थिक छळ होईल. “म्हातारीच्या मरण्याचे दुःख नाही पण काळ सोकावून जाईल.
व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करावी. उपरोक्त मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात नसता मराठवाडा शिक्षक संघ आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करेल याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल असा इशारा सुर्यकांत विश्वासराव
(विभागीय अध्यक्ष), केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, प्रा. डॉ. उमाकांत राठोड (सिनेट सदस्य) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर भाई चंद्रकांत चव्हाण (जिल्हा सचिव) जगन वाघमोडे (जिल्हा उपाध्यक्ष जालना)
नवनाथ मंत्री अशोक ढमढेरे
विनोद केनेकर विलास चव्हाण
कृष्णा गोंडे यांनी केली आहे.



