जालना येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत 28 जूनला शिकाऊ उमेदवार भरती मेळावा
जालना/प्रतिनिधी,दि.26
आयटीआयमध्ये (औद्यागिक प्रशिक्षण संस्था) अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून) जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (कार्यशाळा क्र. 2) येथे शुक्रवार दि. 28 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रा.लि. सहभाग घेणार आहे. तरी अंतिम वर्षात शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. या भरती मेळाव्यासाठी आयटीआयचे जे प्रशिक्षणार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला पात्र आहेत असे सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी (स्थापत्य आरेखक या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोडून) सहभागी होऊ शकतात, असे अंशकालिन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दपत्रकाव्दारे कळविले आहे.