pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फीश वर्कर्स यूनियनच्या गव्हाण कार्यालयाचे उद्घाटन

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

कोळी समाजाच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच कोळी समाजाचे त्यांचे हक्क व अधिकार मिळवूण देण्याच्या उद्देशाने,कोळी समाजाच्या सर्वांगीण प्रगती करण्याच्या अनुषंगाने गव्हाण कोळीवाडा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित पारंपारिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती, महाराष्ट्र स्मॉल स्कूल ट्रेडिशनल फिश वर्कर्स यूनियन या संघटनेच्या कार्यालयाचे उदघाटन पनवेल तालुक्यातील गव्हाण गाव बंदर रोड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम गणेशपूजन झाले.प्रास्तविक मध्ये गव्हाण कोळीवाडा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमेन हितेश कोळी यांनी कार्यालय उद्‌घाटन, स्थापन करण्या पाठिमागील उद्देश, ध्येय सांगीतले. यावेळी रमेश भास्कर कोळी (पारंपारिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती), नंदकुमार पवार साहेब (महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन),अरुण शिवकर (साकव संघटना),कैलास एकनाथ कोळी (अध्यक्ष गव्हाण कोळी समाज),राजेश चंदर कोळी (उपाध्यक्ष गव्हाण कोळी समाज), हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतचे सरपंच परमानंद कोळी, हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, हनुमान कोळीवाडा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन वैभव कोळी,गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन घरत, पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, प्रदीप ठाकूर, नंदकुमार कोळी, प्रीतम कोळी,उरण कोळीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कोळी, डॉमनिक कोळी,हरेश कोळी, महिला सामाजिक कार्यकर्त्या – उज्वला कोळी, नलिनी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.विविध मान्यवरांनी आपापली मते व्यक्त करून संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पवार म्हणाले की जे काही रायगड जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्प मुळे शेतकरी, मच्छिमार बांधव देशोधडीला लागला आहे. नवनवीन प्रकल्प येताना मच्छिमार बांधव, शेतकरी, स्थानिक रहिवाशी यांचा कोणताही विचार होत नाही. नागरिकांना विश्वासात न घेता विविध प्रकल्प राबविले जात असल्यामुळे पर्यावरण तर धोक्यात आले आहे शिवाय मानवी जीवन सुद्धा धोक्यात आले आहे. त्यामुळे आपले अधिकार व हक्क अबाधित ठेवण्यासाठी, पर्यावरण, समुद्राचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र या. उरण मध्ये सेझ मध्ये रिलायन्सचा प्रकल्प आला मात्र शेतकरी, स्थानिक भूमीपुत्र यांच्या यशस्वी लढ्यामुळे तो प्रकल्प रद्द झाला. जनतेच्या मागणीपुढे शासनाला झूकावे लागले. त्यामुळे सर्वांनी एक व्हा, आपल्या न्याय हक्कासाठी संघटित व्हा असे प्रतिपादन नंदकुमार पवार यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायदेशीर व शांततेच्या मार्गाने १७ वर्षे लढा देऊन संघटनेने मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. नुसते पैसे मिळून उपयोग नाही तर सातबारावर प्रत्येक मच्छिमार बांधवांचे नाव चढले पाहिजे. हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन ३८ वर्षे उलटूनही अजूनही झाले नाही. त्यामुळे सातत्याने लढा देणे महत्वाचे आहे.कोणत्याही मच्छिमार बांधवावर अन्याय होता कामा नये यासाठी अन्याया विरोधात आवाज उठविला पाहिजे. कोणत्याही मच्छिमार बांधवावर अन्याय होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे मत सरपंच परमानंद कोळी यांनी व्यक्त केले.साकव संघटनेचे अध्यक्ष अरुण शिवकर यांनीही मच्छिमार बांधव यांना भेडसावत असलेल्या समस्या बाबत चिंता व्यक्त करत अन्यायाला एकजुटीने सामना करण्याचे आवाहन केले. शेवटी मच्छिमार नेते रमेश कोळी यांनी उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, मच्छिमार बांधवाना कोणीच वाली नसल्याने मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.१७ वर्षे संघर्ष केल्यानंतर शासनाने मच्छिमार बांधवाना नुकसान भरपाई दिली. हे संघटनेचे यश आहे. हे यश माझे एकट्याचे नसून सर्वांचे आहे. कर्ता करविता परमेश्वर आहे. आम्ही मात्र निमित्त आहोत. समान विचाराने एकत्र येऊन कार्यालय सुरु केले आहे. केंद्र सरकारकडून मच्छिमार बांधवांना अनेक वेगवेगळ्या योजना आहेत, स्कीम आहेत. पण ते योजना, स्कीम मच्छिमार बांधवांना माहित नसल्याने त्या योजनेचे पैसे सरकारच्या तिजोरीत तसेच पडून आहेत. त्या पैशांचा सदुपयोग होत नाही.अज्ञान तसेच जनजागृती होत नसल्याने अनेक योजणांचा फायदा मच्छिमार बांधवांना घेता येत नाही म्हणून संघटनेचे कार्यालय स्थापन करून त्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे. समुद्रकिनारी असलेले कांदळवन तोडून, झाडे तोडून समुद्र किनारी असलेली जागा हडपण्याचा शासनाचा कुटील डाव आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाला , चुकीचे निर्णयाला विरोध केलाच पाहिजे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले पण आजही समुद्रालगतची जमीन कोळी बांधवांच्या नावावर झाली नाही. त्यामुळे लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारावे लागेल.असे मत मच्छिमार नेते रमेश कोळी यांनी व्यक्त केले.समाधान फेफेरकर प्रस्तूत आम्ही कोळी दर्याचे राजे हाव या गाण्याने – रसिक प्रेषक मंत्रमुग्ध झाले. योगेश आग्रावकर, हदया जाधव , समाधान फोफेरकर आदींनी उत्तम गायन केले.सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक आतिष पाटील यांनी केले.सुंदर असे आयोजन, नियोजन करण्यात आल्याने आयोजकांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे