आदर्श इंग्लिश स्कूल,जामखेडच्या वतीने शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन!
ऐतिहासिक,धार्मिक,सांस्कृतिक,नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी घेतला अस्मरणीय आनंद!

प्रतिनिधी/ अंबड,दि.16
शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली जामखेड येथील आदर्श इंग्लिश स्कूल संपूर्ण अंबड तालुका व जालना जिल्हा बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नावलौकिक प्राप्त शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी विविध उपक्रमाचे वेळोवेळी आयोजन केले जाते.
याचाच भाग म्हणून शैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या अनुषंगाने शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करत महाराष्ट्रातील ऐतिहासिक,धार्मिक,सांस्कृतिक,नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी अस्मरणीय आनंद घेण्याबरोबर प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त केली.
कोकणातील डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळत नागवा बीच, आश्चर्यचकित करणारा समुद्रात स्थापित असणारा,शिल्पकलेचा उत्तम नमुना मुरुड जंजिरा किल्ला, ऐतिहासिक व स्फूर्ती स्थान,स्वराज्याची प्रथम राजधानी रायगड किल्ला, प्रति बालाजी, लाखो भक्तजनांचे श्रद्धास्थान श्री शेत्र जेजुरी येथील मार्तंड मल्हार खंडेरायाच्या दर्शन घेत अभूतपूर्व, अलौकिक अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक,लज्जतदार,चविष्ट जेवण व शुद्ध आरो फिल्टर पाणी विद्यार्थ्यांना सहलीच्या संपूर्ण प्रवासात उपलब्ध करून देण्यात आले.
आदर्श इंग्लिश स्कूल जामखेडच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देत प्रेरणादायी ऊर्जा, आदर्श प्राप्त करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या सहलीचे उत्कृष्ट नियोजन, जबाबदारी पूर्वक कार्य प्रणाली मुळे सहल विनाविघ्न यशस्वी ठरली.
संस्थापक अध्यक्ष डॉ.गंगाधर पांढरे,संस्था सचिव सौ.आशाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राचार्य आर.यार वैद्य, मुख्याध्यापिका वैशाली खिलाडे,डॉ. ऋषी गंगाधर पांढरे, सहशिक्षिका वर्षा पंडित, अनुभवी व कुशल बस वाहन चालक मच्छिंद्र पांढरे, तुळजीराम पांढरे, अमित मोहिते,अनिल वैद्य, पायल वैद्य ओम पांढरे अनुभवी धोंडाआजी, गोलू सावंत, रितेश भालेकर यांनी अथक परीक्षण घेत शैक्षणिक सहल यशस्वी करण्यात परिपूर्ण योगदान दिले.
जबाबदारी पूर्वक व उत्कृष्ट नियोजन अनुसार शैक्षणिक सहल यशस्वी केल्याबद्दल पालक वर्गाकडून आदर्श इंग्लिश स्कूल जामखेडचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.