महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले की, महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाजातील सर्व गोरगरीब घटकांसाठी मागासवर्गीय भटके, विमुक्त जाती यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. व मानवता जपण्याचे कार्य केले. तसेच पिण्याच्या पाण्याचा विहिर सर्वांसाठी खुली केली. मुलींची शाळा काढली. व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षक बनविले. व फातेमा शेख या पहिल्या मुस्लीम शिक्षीका त्यांच्यासमवेत होत्या. यामुळे महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, सचिव सुरेश मानकस, उपाध्यक्ष सुरेश रत्नपारखे, सहसचिव ॲड. रामेश्वर खांडेभराड, वैजीनाथ नागरे, नकुल पराये, मंगेश घुगे, दत्ता खांडेभराड यांनी केली आहे.
याबबतचे निवेदन राष्ट्रपती द्र्रोपती मुरमू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आजितदादा पवार, मा.ना. अतुल सावे, पालकमंत्री पंकजाताई मुंडे , सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाठविले आहे.