१९८४ च्या उरण आंदोलनातील हुतात्मानां ४० व्या स्मृती दिनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले अभिवादन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
न्हावा-शेवा प्रकल्पासाठी भू- जमीन संपादनाच्या वेळी १९८४ ला लोकनेते माजी खासदार स्वगीय दि बा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उरण मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात पाच हुतात्मा व शेकडो शेतकरी जखमी झाले होते, या आंदोलनातील कै नामदेव शंकर घरत, कै रघुनाथ अर्जुन ठाकूर, कै महादेव हिरा पाटील, कै केशव महादेव पाटील व कै.कमलाकर कृष्णा तांडेल या पाच हुतात्मानां ४० व्या स्मृती दिनी मंगळवार दिनाकं १६ जानेवारी २०२४ रोजी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी हुतात्मा मैदान, जासई, तसेच धुतुम व चिरले येथे जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शिवसेना उरण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, शिक्षक नेते नरेश मोकाशी, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, डोंगरी माजी सरपंच निलेश घरत, जासई उपविभागप्रमुख राजन कडू, प्रेमनाथ ठाकूर, धुतुम शाखाप्रमुख कुंदन पाटील, उपसरपंच रविनाथ ठाकूर, ग्रा. सदस्य चंद्रकांत ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रा. सदस्या सुचिता कडू, महिला आघाडी तृप्ती ठाकूर, कांतीलाल ठाकूर, काशिनाथ पाटील, नामदेव पाटील, शरद ठाकूर, हेमंत ठाकूर, सज्जन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, हुतात्म्यांचे वारसदार लक्ष्मण ठाकूर, जितेंद्र घरत व कार्यकर्ते उपस्थित होते