pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खराब रोडची समस्या दहेगांव डावरगांव करांच्या कायम नशिबी.

नेहमीच विनंती,नेहमीची आश्वासन!

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.30

म्हणतात ना काही काहीच्या नशिबी समस्या आश्वासन त्रास हा पाचवीला पुजल्या सारखा असून तुम्ही कितीही विनंती करा नाही म्हणत नाही आणि काम काही होत नाही अशीच वाईट खराब परिस्थिती ही रोड ची झाली असून “गडकरी आणि रोडकरी” अशी सक्षम नेतृत्व असून गल्ली ते दिल्ली भाजपाचे सरकार असून नुसता पांच ते सात किलोमीटर साठी गेल्या २५ वर्षां पासून केलेली मागणी आज ही पदरी निराशा देणारी ठरली असून अजून तरी हा वनवास संपलेला नसून कधी हा रोड होणार या साठी अजून ही आशावादी ग्रामस्थ असून त्यांच्या पदरी आता तरी होकार टाकून कुठल्याही प्रकारे विलंब न करता रोड करण्याची वेळ आली आहे.

टेंभुर्णी ते डावरगाव देवी, दहीगांव, निमखेडा खुर्द रस्त्यात खड्डे डावरगांव देवी येथील प्रताप नवले या तरुणाने रस्त्यातील खड्ड्यात बसून निषेध करून शासन प्रशासन लोकप्रतिनिधी सह सर्वांचे लक्ष्य वेधल्याचे दिसत आहे.सोबत लवकरात लवकर रोडचे काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदरील रोडचे उद्घाटन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते एक वर्ष पूर्वी करण्यात आले होते. परंतु संबंधित रोडचे काम ठेकेदार पप्पू आनंद जालना यांनी घेतलेले असून अद्यापही रोडचे काम चालू केले नसून रोडवर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिक,गरोदर महिला, शेतकरी,शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठेकेदाराच्या आज करतो उद्या करतो म्हणूत एक वर्ष पूर्ण झाले आहे.तरी देखील रोडचे काम सुरू झाले नाही.डावरगाव देवी येथे जाफ्राबाद तालुक्यातील प्रसिध्द जगदंबा मातेचे मंदिर असून या ठिकाणी राज्य भरातून दर पौर्णिमाला येत असतात त्यामुळे भाविकांना देखील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्याने मोठया प्रमाणात अपघाता होत आहे.
टेंभुर्णी शहरातील जवळपास 30 टक्के शेतकरी बांधव शेतात जाण्यासाठी दररोज याच रत्यानेच जाणे येणे करतात, त्याचप्रमाणे दहीगांव,निमखेडा खुर्द,डावरगाव देवी येथील नागरिकांचा हा महत्त्वाचा रस्ता असून. नागरिकांना यांचा त्रास होत आहे.
फोटो ओळ:
यू ट्यूबर फ्रेम व पत्रकार प्रताप नवले खड्ड्यात बसून आपली मागणी करता वेळी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे