pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तिवसा नगरपंचायतीच्या व्हॉल्मनची आत्महत्या:प्रशासनाविरोधात रोष रजा रोखीकरण व वेतन निश्चिती रखडल्यामुळे होते विवंचनेत

0 3 8 6 5 2

मोर्शी ता./प्रतिनिधि,दि.14

तिवसा नगरपंचायतीतून व्हॅाल्मन म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने सोमवारी उशीरा सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, मंगळवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. बाबुराव महादेवराव मकेश्वर (वय ६४, रा. तिवसा) असे आत्महत्या करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे.रजा रोखीकरण आणि वेतन निश्चिती न झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. याच विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांच्या आत्महत्येला तिवसा नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी लता मकेश्वर यांनी केला आहे. आपल्या हक्काच्या रजा रोखीकारण व वेतन निश्चितीतून होणाऱ्या मिळकतीसाठी ते गेल्या पाच वर्षापासून तिवसा नगरपंचायतच्या पायऱ्या झीझवत होते, असे लता मकेश्वर यांचे म्हणणे आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाने त्यांना योग्य ते सहकार्य न केल्यामुळे ही वेळ ओढवली, असे त्यांचे म्हणणे आहे.सन २९१९ साली व्हॉल्मन म्हणून सेवानिवृत्त झालेले बाबुराव मकेश्वर यांनी ग्रामपंचायत काळापासून शंभर रुपयाच्या दैनिक रोजंदारीने काम केले आहे. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी वर्षभर विना मोबदला काम करुन गावकऱ्यांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळेल, याची काळजी घेतली, असे त्यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसापासून ते विवंचनेत होते. दरम्यान सोमवारी रात्री त्यांनी समोरच्या हॉलमध्ये येऊन खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेतला. आज सकाळी ही माहिती उघड झाली. या घटनेची माहिती लगेच तिवसा पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा केला असून मर्ग दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक करित आहेत. आज दिवसभरात नातेवाईकांचे बयान व इतर सर्व बाबींची चौकशी पूर्ण केल्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.जन्म तारखेबाबत दोन वेगवेगळ्या नोंदी तत्कालीन मुख्याधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्या अहवालानुसार मकेश्वर यांच्या जन्माबद्दल दोन वेगवेगळ्या नोंदी आहेत. परिणामी त्यांच्या जन्मतारखेत तफावत निर्माण झाली असून वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या नावे चाळीस हजार रुपयांची वसुली काढली आहे. – शिवदास मुसळे, मुख्याधिकारी नगर पंचायत, तिवसा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे